दिनांक – शनिवार, २६ जून२०२१, सकाळी १०.०० ते सायं ५.००
आपणा सर्वांना माहीत आहेच की कोरोना विषाणूने गेली दीड वर्षे विश्वाला ग्रासले आहे. मार्च २०२० ते मे २०२१ पर्यत भारतात निव्वळ कोरोनाबाधितांची संख्या अंदाजे ३ कोटीपर्यत आहे आणि मृत्यूचे प्रमाण अंदाजे ३.५ लाखपर्यंत आहे. दुसरी लाट तीव्र वेगाने पसरली आणि जीवितहानी मोठ्याप्रमाणावर झाली. ह्या पार्श्वभूमीवर एक समाज म्हणून आपण सर्वानी संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यास सज्ज होण्याची नितांत आवश्यकता आहे.
साथ रोग नियंत्रणासाठी मुख्य आवश्यक असते योग्य माहिती, दक्षता, सहयोग आणि समन्वय. कोरोनाच्या दोन्ही लाटांच्या वेळेस अनेक वैद्यकीयसेवा, कोविडसेंटर, अन्नवाटपा पासून अंत्यविधीसेवादेण्यापर्यत विविधसंस्थांचा, कार्यकर्त्यांचा पुढाकार होता. कोरोनाचे संक्रमणरोखण्यासाठी तातडीच्या गरजा ओळखून लाभार्थी पर्यत पोहोचून, संघटीत होणे आणि यशस्वी यंत्रणाराबवणे हा अभ्यासाचा विषय आहे.
यालाच अनुसरून सेवा सहयोग आणि इतर सामाजिक संस्था एक अभिनव कार्यशाळा आयोजित करीत आहोत.
कार्यशाळेची त्रिसूत्री – प्रबोधन, कार्यपद्धती आणि दक्षता
कार्यशाळा कोणासाठी :
● सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते
● शैक्षणिक संस्था आणि समाजकार्य अभ्यास करणारे विद्यार्थी
● आरोग्यसेवा अधिकारी आणि प्रशासकीय सेवा अधिकारी
● ग्रामसेवक
● कंपनी CSR अधिकारी
कार्यशाळेतील प्रमुख विषय :
● कोविड केअर सेंटर (Covid Care Center) उभारणी वव्यवस्थापन
● लसीकरण, विलगीकरण, तपासण्या, उपचारांचे अनुभव, आरोग्यदायी जीवनपद्धती
● हेल्पलाईन उभारणी, तंत्रज्ञान सहाय्य, विदा (Data) संकलन
● कोविडचा सामना करण्यासाठी संस्था व कार्यकर्त्यांचे यशस्वी उपक्रमवप्रयोग - यशोगाथा
● CSR अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन
सर्व विषय मांडणी, परिसंवाद आणि तज्ञांची सत्रे ह्यास्वरूपात असेल. वरील विषयासह अन्य विषयाची अनेक सत्र आयोजित केली आहेत.
कार्य शाळेमध्ये सहभागी काव्हावे ?
● सर्वतज्ञ मंडळींचे मार्गदर्शन व अधिकृत माहिती एकाच ठिकाणी
● विविध संसाधनाची संकलित माहिती
● निधी संकलन मार्गदर्शन
● प्रशिक्षणातून अन्य कार्यकर्ते प्रशिक्षित करणे
● कार्याची प्रसिद्धी
● सहभाग प्रमाणपत्र
कार्यशाळेसाठी कोणत्याही प्रकारचे सहभाग शुल्क आकारले नाही. परंतुत्यासाठी नोंदणी आवश्यक आहे.