जनसेवा न्यासा आणि इ - व्याख्यानमाला आयोजित ऑनलाईन स्टोरी-टेलिंग स्पर्धा

    05-Jan-2021
Total Views |

जनसेवा न्यास - व्याख्यानमाला यांच्या संयुक्त विद्यमानाने या वर्षी महिलांसाठी ऑनलाईन स्पर्धा आयोजित अली आहे. स्पर्धेचा विषय "रामायणातील गोष्टी" हा असून ही स्पर्धा सर्व महिलांसाठी खुली असणार आहे. यात सुमारे ५०० ते ६०० महिला सहभागी होतील असा मानस आहे. यात स्पर्धकांनी त्यांच्या गोष्टीचे ते मिनिटाचे व्हिडिओ आमच्याकडे पाठवायचे असून त्या आलेल्या व्हिडिओ प्रवेशिकांमधून अंतिम विजेते ठरविले जातील.

photo_1  H x W: 

नियम अटी

 

. वयोगट- 18 वर्षावरील सर्व महिलांसाठी

. गोष्टीचा विषय- रामायणातील गोष्टी

. गोष्ट सांगण्याचा कालावधी- तीन ते पाच मिनिटे

. गोष्ट पाठवण्याचे माध्यम- ऑडिओ किंवा व्हिडिओ

. गोष्ट पाठवण्याची तारीख- 12 जानेवारी ते 31 जानेवारी

. निकाल बक्षीस समारंभ- 19 फेब्रुवारी

. ऑडिओ-व्हिडिओ चे परिक्षण स्वतंत्र होईल.

ऑडिओ परिक्षणाचे निकष

 

. सुरुवात

. शेवट

. मुद्देसूद मांडणी

. आवाजातील चढ-उतार

. उच्चार

. गोष्टीत सामावून घेण्याची क्षमता

व्हिडिओ परिक्षणाचे निकष

 

. सुरुवात

. शेवट

. मुद्देसूद मांडणी

. हावभाव

. हातवारे

. कल्पकता

. गोष्ट सामावून घेण्याची क्षमता

८. एकूण १०० मार्क आपल्या गोष्टीला असतील ज्यात ५० मार्क परीक्षक ठरवतील, आणि ५० मार्क प्रेक्षकांनी केलेल्या आपल्या व्हिडीओ चे फेसबुक वरील शेर, कॉमेंट, लाईक यांना असतील. 
उदहारण - विडिओ शेर - २ मार्क
व्हिडीओ लाईक - १ मार्क
व्हिडीओ वर कॉमेंट - १ मार्क

स्पर्धेची सुरुवात १२ जानेवारी २०२१ रोजी राजमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने होणार असून ३१ जानेवारी पर्यत गोष्टीचे व्हिडीओ ऑडीओ स्वीकारण्यात येतील.हे व्हिडीओ जनसेवा न्यास व्याख्यानमाला यांच्या फेसबुक पेज वरून शेअर करण्यात येतील.

गोष्टींचे आणि मुलांच्या मानसशास्त्रीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाचे महत्वाचे नाते आहे. गोष्ट ही अनेक पिढ्यांमधला दुवा देखील आहे. ही घरगुती ज्ञान-मनोरंजनाची कला लुप्त होऊ नये, तिचे संवर्धन व्हावे , ती वाढावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

तसेच संस्कारक्षम गोष्टी ऐकण्याची सवय लागावी हासुद्धा यामागचा हेतू आहे.

टीप - खाली दिलेल्या मेल वर आपले विडिओ पाठवणे.
 
खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करून व्हिडीओ नक्की बघा.. 
 
 
 
 
Special-Embed-Code-2
Special-Embed-Code-2