अविनाश धर्माधिकारी

अविनाश धर्माधिकारी हे भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी आहेत. ते इ.स. १९८६ साली भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले. त्यांनी फलटण येथे विभागीय उपायुक्त, रत्‍नागिरी आणि अमरावती जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे सचिव, अशा महत्त्वाच्या पदांचा कार्यभार सांभाळला. त्यांनी मार्च १इ.स. १९९६ रोजी सेवेचा राजीनामा दिला आणि त्यानंतर पुण्यात चाणक्य मंडल परिवार ही यू.पी.एस.सी आणि एम.पी.एस.सी. या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी प्रशिक्षण संस्था स्थापन केली.

@@BEFORE-BODY-END-DATA@@