चारुदत्त आफळे

चारुदत्त आफळे हे महाराष्ट्रातील प्रसिध्द किर्तनकार आहेत. आफळे बुवा म्हणून सगळीकडे प्रसिध्द असलेले गोविंदस्वामी आफळे हे त्यांचे वडील होत. आध्यात्मिक विचारांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या व्यक्तींना बुवा या उपाधीने आदराने संबोधले जाते. चारुदत्त आफळे यांनी आपले किर्तनाबाबतचे प्राथमिक शिक्षण आपल्या पालकांकडून घेतले. तसंच पंडीत शरद गोखले, पंडित पद्माकर कुलकर्णी, मुकुंदबुवा गोखले, आगाशे बुवा, मधुकर खाडीलकर, पंडित विजय बक्ष या विद्वानांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. 

@@BEFORE-BODY-END-DATA@@