भारतीय सैन्यदलांत चाळीस वर्षांचा प्रदिर्घ अनुभव असलेले जनरल डी बी शेकटकर यांनी वाणिज्य शाखेतील पदवी, विज्ञना विषयाची पदव्युत्तर पदवी, डिफेंस स्टडीज मध्ये एम फील, विज्ञान व्यवस्थापन तसंच संरक्षण आणि सांख्यिकी अभ्यासक्रमांत त्यांनी पी एचडी पदवी संपादन केली आहे. वॉरफेअर सायकोलॉजी या विषयांत त्यांनी पी एच डी पदवी संपादन केली आहे. शस्त्रास्त्र व्यवस्थापनाबाबत त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. रोटरी इंटरनॅशनल तर्फे पॉल हॅरिस फेलेशिप त्यांना मिळाली आहे.

संरक्षण क्षेत्रातील कारकिर्दीत १९६५ च्या काश्मिरमध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युध्दांत त्यांनी सहभाग घेतला होता. १९९९ मध्ये झालेल्या कारगील युध्दांत अरुणाचल प्रदेशातील चीनच्या सीमेलगत भारतीय सैन्याची संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली होती. नंतरच्या काळांत चीन, म्यानमार, भुतान, आणि बांग्लादेश सीमेदरम्यान सीमा व्यवस्थापनाचे काम त्यांनी साभाळले होते. ईशान्य भारतातील  सीमा भागातील घुसखोरीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आसाम, नागालँड, मणीपूर, मिझोरम, त्रिपुरा आणि इतर भागातील व्यवस्थापन त्यांनी पाहिले आहे.      

पंजाबमध्ये झालेल्या ब्लु स्टार ऑपरेशनमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर पंजाबमधील दहशतवाद विरोधी लढाईत ब्रिगेडीअर म्हणून, काश्मिरमध्ये मेजर जनरल म्हणून तर आसाम आणि ईशान्य भारतातील बहुताश भागांत लेफ्टनंट जनरल म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये उद्भवलेल्या सामाजिक तणावाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे महत्त्वपूर्ण कामं त्यांनी आपल्या कारकिर्दित केले आहे. चीन आणि पुर्व आशियाई देशांसाठीच्या सैन्य ऑपरेशन्स बाबत नवी दिल्लीतील मुख्यालयांत उपनिदेशक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. भारत चीन सीमा आणि त्याच्याशी संबंधित मुद्यांचा अभ्यास करण्यासाठी असलेल्या संयुक्त गटाचे तसंच इतर सीमाविवाद मिटवण्याबाबत स्थापन करण्यात आलेल्या तज्ञ गटाचे ते सदस्य होते. भारतीय सीमाभागांत शांतता आणि स्थैर्य स्थिती राखण्यासाठी माजी पंतप्रधान नरसिंहराव यांच्या कारकिर्दित सामंजस्य कराराचा आराखडा त्यांनी तयार केला होता. भारत चीन तसंच सियाचीन बाबत पाकिस्तान सीमेसंदर्भातील वाटाघाटीसाठीच्या चर्चेतही त्यांनी सहभाग नोंदवला होता. भारत अमेरिका परस्पर सहकार्य आणि द्विपक्षीय मुद्यांसंदर्भातील तज्ञ समितीचे ते सदस्य होते. जम्मू आणि काश्मिरमधील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये किती दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते याचा तपशील ठेवण्याची गरज असल्याचा आग्रह त्यांनी धरला आहे.

"/> भारतीय सैन्यदलांत चाळीस वर्षांचा प्रदिर्घ अनुभव असलेले जनरल डी बी शेकटकर यांनी वाणिज्य शाखेतील पदवी, विज्ञना विषयाची पदव्युत्तर पदवी, डिफेंस स्टडीज मध्ये एम फील, विज्ञान व्यवस्थापन तसंच संरक्षण आणि सांख्यिकी अभ्यासक्रमांत त्यांनी पी एचडी पदवी संपादन केली आहे. वॉरफेअर सायकोलॉजी या विषयांत त्यांनी पी एच डी पदवी संपादन केली आहे. शस्त्रास्त्र व्यवस्थापनाबाबत त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. रोटरी इंटरनॅशनल तर्फे पॉल हॅरिस फेलेशिप त्यांना मिळाली आहे.

संरक्षण क्षेत्रातील कारकिर्दीत १९६५ च्या काश्मिरमध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युध्दांत त्यांनी सहभाग घेतला होता. १९९९ मध्ये झालेल्या कारगील युध्दांत अरुणाचल प्रदेशातील चीनच्या सीमेलगत भारतीय सैन्याची संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली होती. नंतरच्या काळांत चीन, म्यानमार, भुतान, आणि बांग्लादेश सीमेदरम्यान सीमा व्यवस्थापनाचे काम त्यांनी साभाळले होते. ईशान्य भारतातील  सीमा भागातील घुसखोरीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आसाम, नागालँड, मणीपूर, मिझोरम, त्रिपुरा आणि इतर भागातील व्यवस्थापन त्यांनी पाहिले आहे.      

पंजाबमध्ये झालेल्या ब्लु स्टार ऑपरेशनमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर पंजाबमधील दहशतवाद विरोधी लढाईत ब्रिगेडीअर म्हणून, काश्मिरमध्ये मेजर जनरल म्हणून तर आसाम आणि ईशान्य भारतातील बहुताश भागांत लेफ्टनंट जनरल म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये उद्भवलेल्या सामाजिक तणावाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे महत्त्वपूर्ण कामं त्यांनी आपल्या कारकिर्दित केले आहे. चीन आणि पुर्व आशियाई देशांसाठीच्या सैन्य ऑपरेशन्स बाबत नवी दिल्लीतील मुख्यालयांत उपनिदेशक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. भारत चीन सीमा आणि त्याच्याशी संबंधित मुद्यांचा अभ्यास करण्यासाठी असलेल्या संयुक्त गटाचे तसंच इतर सीमाविवाद मिटवण्याबाबत स्थापन करण्यात आलेल्या तज्ञ गटाचे ते सदस्य होते. भारतीय सीमाभागांत शांतता आणि स्थैर्य स्थिती राखण्यासाठी माजी पंतप्रधान नरसिंहराव यांच्या कारकिर्दित सामंजस्य कराराचा आराखडा त्यांनी तयार केला होता. भारत चीन तसंच सियाचीन बाबत पाकिस्तान सीमेसंदर्भातील वाटाघाटीसाठीच्या चर्चेतही त्यांनी सहभाग नोंदवला होता. भारत अमेरिका परस्पर सहकार्य आणि द्विपक्षीय मुद्यांसंदर्भातील तज्ञ समितीचे ते सदस्य होते. जम्मू आणि काश्मिरमधील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये किती दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते याचा तपशील ठेवण्याची गरज असल्याचा आग्रह त्यांनी धरला आहे.

"> जनरल डी बी शेकटकर

जनरल डी बी शेकटकर

भारतीय सैन्यदलांत चाळीस वर्षांचा प्रदिर्घ अनुभव असलेले जनरल डी बी शेकटकर यांनी वाणिज्य शाखेतील पदवी, विज्ञना विषयाची पदव्युत्तर पदवी, डिफेंस स्टडीज मध्ये एम फील, विज्ञान व्यवस्थापन तसंच संरक्षण आणि सांख्यिकी अभ्यासक्रमांत त्यांनी पी एचडी पदवी संपादन केली आहे. वॉरफेअर सायकोलॉजी या विषयांत त्यांनी पी एच डी पदवी संपादन केली आहे. शस्त्रास्त्र व्यवस्थापनाबाबत त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. रोटरी इंटरनॅशनल तर्फे पॉल हॅरिस फेलेशिप त्यांना मिळाली आहे.

संरक्षण क्षेत्रातील कारकिर्दीत १९६५ च्या काश्मिरमध्ये झालेल्या भारत पाकिस्तान युध्दांत त्यांनी सहभाग घेतला होता. १९९९ मध्ये झालेल्या कारगील युध्दांत अरुणाचल प्रदेशातील चीनच्या सीमेलगत भारतीय सैन्याची संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली होती. नंतरच्या काळांत चीन, म्यानमार, भुतान, आणि बांग्लादेश सीमेदरम्यान सीमा व्यवस्थापनाचे काम त्यांनी साभाळले होते. ईशान्य भारतातील  सीमा भागातील घुसखोरीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आसाम, नागालँड, मणीपूर, मिझोरम, त्रिपुरा आणि इतर भागातील व्यवस्थापन त्यांनी पाहिले आहे.      

पंजाबमध्ये झालेल्या ब्लु स्टार ऑपरेशनमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर पंजाबमधील दहशतवाद विरोधी लढाईत ब्रिगेडीअर म्हणून, काश्मिरमध्ये मेजर जनरल म्हणून तर आसाम आणि ईशान्य भारतातील बहुताश भागांत लेफ्टनंट जनरल म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये उद्भवलेल्या सामाजिक तणावाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे महत्त्वपूर्ण कामं त्यांनी आपल्या कारकिर्दित केले आहे. चीन आणि पुर्व आशियाई देशांसाठीच्या सैन्य ऑपरेशन्स बाबत नवी दिल्लीतील मुख्यालयांत उपनिदेशक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. भारत चीन सीमा आणि त्याच्याशी संबंधित मुद्यांचा अभ्यास करण्यासाठी असलेल्या संयुक्त गटाचे तसंच इतर सीमाविवाद मिटवण्याबाबत स्थापन करण्यात आलेल्या तज्ञ गटाचे ते सदस्य होते. भारतीय सीमाभागांत शांतता आणि स्थैर्य स्थिती राखण्यासाठी माजी पंतप्रधान नरसिंहराव यांच्या कारकिर्दित सामंजस्य कराराचा आराखडा त्यांनी तयार केला होता. भारत चीन तसंच सियाचीन बाबत पाकिस्तान सीमेसंदर्भातील वाटाघाटीसाठीच्या चर्चेतही त्यांनी सहभाग नोंदवला होता. भारत अमेरिका परस्पर सहकार्य आणि द्विपक्षीय मुद्यांसंदर्भातील तज्ञ समितीचे ते सदस्य होते. जम्मू आणि काश्मिरमधील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये किती दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते याचा तपशील ठेवण्याची गरज असल्याचा आग्रह त्यांनी धरला आहे.

@@BEFORE-BODY-END-DATA@@